पतंगाला अडकून हवेत उडून गेली 3 वर्षांची चिमुरडी, पहा व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशविदेशात पंतग उत्सवाला विशेष महत्व आहे. सध्या तैवानमध्ये पतंग महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, या कार्यक्रमादरम्यान एक भयंकर प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महोत्सवादरम्यान एका मोठ्या पतंगाला एक 3 वर्षांची चिमुरडी अडकली होती. त्यानंतर बघता बघता ही चिमुरडी हवेत उडून तब्बल 100 फूट उंच गेल्यानंतर लोकांच्या लक्षात आले.

मुलगी हवेत उडाल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुलगी भला मोठा पतंग उडवत असताना अचानक वार्‍याबरोबर उडून गेली. 100 फूट वर गेल्यानंतर अचानक मुलीचा हात निसटला आणि ती खाली पडली. तेवढ्यात खाली उभ्या असलेल्या नागरिकांनी तिला पकडल्यामुळे मुलीचा जीव वाचला. दरम्यान, मुलीला किरकोळ दुखापत झाली. जोरदार वार्‍यामुळे ही मुलगी उडून गेली. मात्र योग्यवेळी लोकांनी या चिमुरडीचा जीव वाचवला. हा प्रकार घडल्यानंतर तैवानमधील हिन्शू गावात प्रशासनाने पंतग महोत्सव स्थगित केला आहे.