हरियाणातून लष्करी सैन्याची माहिती पाकिस्तानला पाठविणार्‍या तिघे ‘गोत्यात’, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणाच्या हिसारमधील मिलिटरी इंटेलिजेंस आणि मिलिटरी पोलिसांनी कॅंट भागात लष्कराची हेरगिरी करण्याच्या संदर्भात मुझफ्फरनगरमधील तीन तरुणांना अटक केली आहे. हे तिघेही सैन्यात होणाऱ्या घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवत होते.

त्यांच्याजवळ व्हिडिओ क्लिप्स, व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस आणि काही फोटो पोलिसांना सापडले. तिन्ही आरोपींना हिसार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या तीन आठवड्यापूर्वी तिन्ही आरोपींनी एका कंपनीत कामगार म्हणून प्रवेश केला आणि दुसर्‍याच दिवसापासून सैन्य दलातील घडामोडी मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्यास सुरवात केली. ते पाकिस्तानी हेरांशी संपर्कात होते आणि त्यांना सैन्यातील घडामोडी पाठवत होते.

शेरपूर गावचा रहिवासी मेहताब (वय २८), शामली येथील मसाबी गावचा रहिवासी खालिद (२५) आणि मुझफ्फरनगरमधील शेरपूर खेड्यातील रहिवासी रागीब वय (३४) एका आठवड्यापूर्वी कंपनीत सामील झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त