पुणे पोलीसनामा ऑनलाईन – चाकूचा धाक दाखवून २३ वर्षीय तरुणाला लुबाडत त्याच्याकडूल मोबाईल व रोख रक्कम हिसकावून पळालेल्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम मधूकर भूरूक (२०), यश अशोक अग्रवाल (२१), कुमार अक्षय खारपे (१९, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर माधव शिवाजी वळते (२३, टिळेकरनगर, कोंढवा) याने याप्रकऱणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास टिळेकर नगरकडून इस्कॉन मंदिराजवळील कच्च्या रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी त्या दोघांना शुभम भुरुक, यश अग्रवाल, कुमार खारपे या तिघांनी अडवून चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील विवो व एमआय कंपनीचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.