पुणे : जुन्नर तालुक्यातील धरणात बोट उलटून ३ आदिवासी तरुणांचा मृत्यू

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली होडी पाण्यात बुडाली. त्यात ३ आदीवासी तरुणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ही घटना घडली.

गणेश भाऊ साबळे, (वय २५), स्वप्नल बाळू साबळे (वय २१) आणि पंढरीनाथ मारुती मुंढे (वय. ३१, रा. पेठेचीवाडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

निमगिरी आणि राजूर परिसरातील ८ जण शुक्रवारी सकाळी नउच्या सुमारा मासेमारी करणयासाठी माणिकडोह धरणाच्या क्षेत्रात होडी घेऊन निघाले होते. त्यावेळी या सर्वांचा भार न पेलवल्याने तिघे पाण्यात पडले. तर इतर ५ जण पोहत बाहेर आले. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या तिघांचा शोध घेण्यात आला. परंतु एनडीआरएफचे पथक आले. पथकाने तिघांचे मृतदेह अवघ्या १० मिनिटांत बाहेर काढला. तिघेही तरुण शुक्रवारी माणिकडोह धरणात मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची होडी बुडाली.