×
Homeक्राईम स्टोरीनागपूरात भरदिवसा खुनाचा थरार ! प्रॉपर्टीच्या वादातून सपासप वार करुन खून

नागपूरात भरदिवसा खुनाचा थरार ! प्रॉपर्टीच्या वादातून सपासप वार करुन खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रॉपर्टीच्या वादातून (Property Dispute) एका व्यक्तीचा भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुड्डू तिवारी असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही थरारक घटना कमाल चौकाजवळच्या शनिवार बाजारात गुरुवारी (दि.17) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी पिंटू किल्लेदार आणि विवेक गोडबोले या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

गुड्डू तिवारी हा न्यायालय परिसरात वाहन पार्किंगचे काम करत होता. तर काही दिवसांपूर्वी गुड्डू, पिंटू आणि विवेक हे तिघेजण प्रॉपर्टी डिलींगचे काम करत होते. त्यांचे जुने क्राईम रेकॉर्डही आहे. एका प्रॉपर्टीच्या सौद्यावरुन दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. आज सायंकाळी हे तिघेजण शनिवार बाजारातील अवैध गुत्त्यावर एका झोपडीत बसले होते. त्यावेळी दारुच्या नशेत त्यांच्यात पुन्हा वाद झाले.

गुड्डूने त्यांना शिवीगाळ केल्याने संतापलेल्या पिंटू आणि विवेकने गुड्डूवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुड्डूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बाजारात मोठी खळबळ उडाली.अनेकांनी आपली दुकाने गुंडाळून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करुन काही वेळात पिंटू आणि विवेकला ताब्यात घेतले. पुढील तपास पाचपावली पोलिस करत आहेत.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News