पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल – डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला अचानक पेट, 9 हजार लिटर डिझेल तर, 10 हजार लिटर पेट्रोलचे मोठे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरला पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा ( ता हवेली ) येथे आग लागली. यामध्ये टॅकर जळूूून खाक झाला आहे. आगीचे कारण समजले नाही. परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (२ मार्च ) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास टँकरमध्ये लोणी काळभोर येेेेथील एचपीसीएल टर्मिनल मधूून डिझेल व पेट्रोल भरण्यात आले. हा टॅकर महाबळेश्वर येथील ईराणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल व डिझेल खाली करण्यासाठी जाणार होता. परंंतू रात्रीची वेळ व घाट – रस्ता यामुळे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मालक सुंबे यांचे थेऊर फाटा येथील पार्किंग मध्ये लावण्यात आला होता. तो पहाटे महाबळेश्वरला जाणार होता. टँकर क्रमांक (एमएच १२ एमएक्स ७११६) जळालेला आहे. टँकरसह ९ हजार लिटर डिझेल व १० हजार लिटर पेट्रोल जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा टॅकर श्रीकांत राजेंद्र सुंबे यांच्या मालकीचा आहे. टँकर हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये पेट्रोल – डिझेलची वाहतूक करतो.

दरम्यान, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे – पाटील, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास टँकरला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस व त्यानंतर पीएमआरडीए अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतू तोपर्यंत टॅकर पूर्णपणे जळून खाक झाला होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून टँकरच्या शेजारी उभे असलेले २ ट्रक लोणी काळभोर पोलीसांच्या मदतीने सुरक्षितपणे बाजूला काढले. अन्यथा या नुकसानीची तीव्रता वाढून मोठा अनर्थ घडला असता.