‘या’ तीन कारणांमुळे होते घशात खरखर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पोटातील अ‍ॅसिड किंवा पित्त जेव्हा अन्ननलिकेत येतो. तेव्हा नलिकेच्या आत जळजळ होते. कित्येकदा हे अ‍ॅसिड घशापर्यंत पोहोचते. जर तुम्हाला सतत घशात खरखर होत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.

घशाला खरखर होण्याचे पहिले कारण आहे, घशाला सूज येणे. घशामध्ये सूज येणे जसे अ‍ॅसोफॅगिटिसमुळेही घशात खरखर होऊ शकते. यामुळे गिळतांना त्रासही होऊ शकतो. जर आठ दिवसांपेक्षा जास्त हा त्रास असेल तर डॉक्टरांकडे जावे.

दुसरे कारण आहे छातीत जळजळ होणे. पोटातील अ‍ॅसिड किंवा पित्त जेव्हा अन्ननलिकेत येतो. तेव्हा नलिकेच्या आत जळजळ होते. कित्येकदा हे अ‍ॅसिड घशापर्यंत पोहोचते ज्यामुळे घशातील खरखर, जुना खोकला किंवा घसा बसू शकतो.

तिसरे कारण आहे व्हायरल इन्फेक्शन. यामुळे खोकला, नाकामध्ये खाज येणे, मुलांमध्ये अतिसार आणि घसा बसण्यासोबतच खरखर होते. व्हायरल इन्फेक्शनसाठी डॉक्टरांनी दिलेली औषध घेतल्यास यामध्ये आराम मिळतो.

घसा खरखर करत असल्यास गुळण्या केल्यास फायदा होता. कोमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका आणि दिवसभरात तीन-चार वेळा गुळण्या करा. जास्त प्रमाणात गरम द्रवपदार्थ घ्या जसे मध टाकून चहा, गरम सूप घशाच्या खरखरीपासून आराम देतो. यापासून आराम मिळण्यासाठी अद्रकाचा रस फायदेशीर होऊ शकतो. अद्रक गरम असल्यामुळे घशाची खरखर दूर होते.