Throwback : ‘या’ कारणामुळं दीपिका पादुकोण आणि युवराज सिंगचं झालं होतं ‘ब्रेकअप’ !

पोलिसनामा ऑनलाइन –एके काळी बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि भारताचा क्रिकेटर युवराज सिंग याचं नातं खूप चर्चेत राहिलं आहे. परंतु यानंतर मात्र दोघंही वेगळे झाले आणि आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. आज दोघं पुढे निघून गेले आहेत.

दीपिकानं ओम शांती ओम या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यावेळी दीपिकाचं नाव महेंद्र सिंग धोनी सोबत जोडलं गेलं होतं. परंतु काही दिवसांनंतरच दीपिका आणि युवराज सिंग यांच्या डेटींगच्या बातम्या समोर येताना दिसल्या. परंतु हे नातं काही जास्त दिवस टिकलं नाही. यानंतर दीपिका रणबीर कपूरला डेट करू लागली.

दीपिका युवराजबद्दल बोलली होती असं काही

एका मुलाखतीत दीपिकानं सांगितलं होतं की, युवराज तिच्या कामात हस्तक्षेप करतो आणि यामुळंच तिच्या नात्यात दरी येऊ लागली. याबाबत युवराजनंही खुलून भाष्य केलेलं आहे.

ब्रेकअपनंतर युवराज दीपिकाबद्दल म्हणाला होता की…

एका जुन्या मुलाखतीत दीपिकाबद्दल बोलताना युवराज म्हणाला होता की, “मी साऊथ अफ्रिकेवरून परत आलो होतो. कॉमन दोस्तांमुळं आमची ओळख झाली होती. आम्ही एकमेकांना लाईक करायला लागलो होतो. आम्हाला एकमेकांना ओळखायचं होतं. परंतु त्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही. आम्हाला पाहायचं होतं नातं टिकतंय की नाही. जशा गोष्टी पुढे गेल्या तिनं मुव्ह ऑन केलं. मीही तेच केलं.”

युवराजनं नाव न घेता दीपिका आणि रणबीर यांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता की, “ती माझ्यासोबत होती परंतु तिनं आता दुसऱ्यासोबत मुव्ह ऑन केलं आहे. मला वाटतं की, ही पर्सनल चॉईस आहे. परंतु कोणाला जर या नात्यातून बाहेर पडायचं असेल तर दुसरा व्यक्ती जास्त काही करू शकत नाही. मी कोणाला दोष नाही देत आहे परंतु सत्य सांगत आहे.”

https://www.instagram.com/p/B-yoT8Rh7nP/