अभिनेत्री करिश्मा कपूरने शेअर केला ‘थ्रोबॅक’ फोटो, म्हणाली – ‘ही खरंच मी आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करिश्मा कपूरने आपला 90 च्या दशकातील एक फोटो शेअर केला आहे. करिश्मा अभिनय करणारी कपूर खानदानातील पहिली महिला होती. करिश्माची अ‍ॅक्टींग लोकांना जेवढी आडवत होती तेवढाच तिचा लुकही प्रेक्षकांना आवडत होता. वाढत्या वयासोबत ती तितकीच सुंदर आणि ताजीतवानी दिसत होती. 90 च्या दशकातील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसचा विषय असेल तर प्रेक्षक सर्वात आधी करिश्माचा उल्लेख करतील.

नुकताच करिश्माने तिचा थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती जिन्स टॉपमध्ये दिसत आहे. करिश्माने छान पोज दिली आहे. करिश्मा खूपच यंग आणि सुंदर दिसत आहे. यात तिचा बोल्ड अंदाज पाहण्यासारखा आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये करिश्मा म्हणते की, “ही खरंच मी आहे का ?”

View this post on Instagram

Is that really me ?? 😆 #flashbackfriday #90sgirl

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच करिश्मा वेब सीरीजमधून कमबॅक करणार आहे. सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. परंतु लवकरच ती 2019 मध्ये बनलेल्या मेंटलहुड या बालाजीच्या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

View this post on Instagram

#silverlining 🤖

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

 

Visit  :Policenama.com

 

You might also like