धुळे : बस व कारवर दगडफेक ; हजारोचे नुकसान ; बस चालक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – साक्री रोड सिंचन भवन समोर रस्त्यावर अज्ञात पाच ते सहा जणांनी धिंगाणा घालत गुजरातहुन धुळेकडे येणारी (बस क्रं.जी. जे 18 झेड 3686) वर अज्ञात 5 ते 6 जणांनी दगडफेक करत काचा फोडल्या. यात चालक गिरीष कुमार मेहता (रा.गुजरात नडिया) हे जखमी झाले. यानंतर लगेचच पाठिमागुन येणाऱ्या नविन कारच्याहि काचा फोडून नुकसान केले आहे. परिसरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पागंविण्यासाठी सौम्य बळाचा वापर पोलीसांनी केला.

शहरात धुळीवंदन निमित्त आनंद साजरा करताना काही समाजकंटकांनी काही चौकात हाणामारीच्या घटना घडल्या आहे.

पोलीस दगडफेक करणाऱ्या लोकांचा तपास करत आहे . घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणावपुर्ण वातावरण असून शांतता आहे.

उशीरा पर्यंत पोलीसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

You might also like