सावधान ! देशातील 15 राज्यांना अतिवृष्टीचा ‘इशारा’, मुंबईतील रस्त्यांवर 4 फुटापर्यंत पाणी (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील १५ राज्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून देशात मोठ्या प्रमाणावर पावसाने कहर केला आहे. गुजरातमधील बडोद्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून पूरपरिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असून रस्त्यांवर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. राजधानी दिल्लीत देखील पावसाने कहर केला असून पुढील दोन तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तरप्रदेशमधील मोदी नगर, गाजियाबाद, चपरौला, फरीदाबाद, पलवल, सोहाना, बिजनौर, रुडकी, जहांगीराबाद, गुलोठी, बुलंदशहर, अलीगढ, अमरोहा आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये देखील पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असून मुंबईला याचा मोठा फटका बसणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच किनारपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, उत्तराखंड आणि ओडिशामधील काही भागांत देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, किनारपट्टीवरील कर्नाटक, तेलंगाना, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात अली असून नागरिकांनी काळजी घेण्याची आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –