थंडी ने घेतला बळी ; एका भिकार्याचा गेला थंडी मुळे जीव

उमरी : (माधव मेकेवाड) : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण रुग्णालयात दिला नाही आसरा म्हणून त्याचा आवारात झाला झाला मृत्यू? अशी चर्चा उलट सुलट निघत आहे अनेक जण त्या आवारात प्रवेश केले असतील त्या कुडकूडणार्या भिकारी कोणाला दिसला नसेल का? काल अचानक वाढलेल्या थंडीने नांदेड जिल्ह्यात एकाचा बळी घेतला.

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एका अज्ञात वेडसर भीकरी याचा गारठून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सुमारे साठ वर्षे वयाचा हा भिकारी असावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात त्या वेडसर भिकार्याची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी उमरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मराठवाडा गारठला असताना मराठवाड्यात सोमवारी सर्वात कमी म्हणजे १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान बीडमध्ये नोंदविण्यात आले. नांदेड मध्ये १३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. त्या भिकार्याची ओळख पटणे अशक्य असल्याचं प्राथमिक आनंदच असून त्या ठिकानी सार्वजनिक नगर परिषद तर्फे त्याचा अंत्यसंस्कार केला असे ह्या वेळी सांगितलं गेलं.

असे अनेक भिकारी उमरी,नांदेड येथे रेल्वे स्टेशन परिसर व इतर ठिकाणी दिसतात त्यांना आशा थंडीत वास्तव्य नसल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचे समजले आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन काही करेल का सामाजिक संघटना काही करतील का अशी चर्चा या वेळी होत होती