Thyroid Disease Symptoms And Precautions | थायरॉइडच्या विकारात ‘या’ 3 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा तुमची समस्या वाढू शकते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बैठी जीवनशैली, आहारातील बिघाड (Sedentary Lifestyle, Dietary Disorders) आणि इतर अनेक कारणांमुळे गेल्या दशकात थायरॉइड (Thyroid) या विकारात लक्षणीय वाढ झाली आहे. घशाच्या खालच्या भागात असलेल्या फुलपाखराच्या आकाराच्या थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये आलेल्या अडचणींमुळे लोकांना अशा प्रकारची समस्या उद्भवते (Thyroid Disease Symptoms And Precautions). भारतातील हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर स्टॅटिस्टिक्सने (Health and Family Welfare Statistics) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०१३ पर्यंत दर २० व्यक्तींमागे एक व्यक्ती थायरॉईड आजाराने ग्रस्त होती, हा आकडा गेल्या काही वर्षांत वाढला आहे. थायरॉईड डिसऑर्डरमुळे, आरोग्याच्या विविध समस्या (Health Problems) उद्भवतात. त्याचे वेळेवर निदान आणि उपचार केले तर पुढील आजारांचा धोका टळू शकतो (Thyroid Disease Symptoms And Precautions).

 

कालांतराने किंवा उपचार न केलेल्या हायपोथायरॉईडीझममुळे (Hypothyroidism) आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, सांधेदुखी, वंध्यत्व आणि हृदयरोगाचा धोका (Obesity, Joint Pain, Infertility and Risk Of Heart Disease) वाढतो. याबद्दलची माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाय वापरणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे (Thyroid Disease Symptoms And Precautions).

 

धूम्रपानामुळे धोका (Risk From Smoking) –
सिगारेटच्या धुरामध्ये विषारी पदार्थ (Toxic Substances) असतात जे आपल्या थायरॉईड ग्रंथीवर परिणाम करू शकतात. सिगारेटच्या धुरामध्ये थायोसायनेट (Thiocyanate) नावाचा विषारी पदार्थ असतो. तो आयोडीनचे शोषण करण्याच्या क्रियेत व्यत्यय आणतो. या परिस्थितीत थायरॉइड हार्मोन्सचे उत्पादन रोखले जाते. सर्वसाधारणपणे, धूम्रपान केल्याने थायरॉईड-उत्तेजक संप्रेरक (टीएसएच) पातळी कमी होऊ शकते.

 

सकस आहार महत्वाचा (Healthy Diet Is Important) –
शरीर निरोगी राहण्यासाठी सकस आहाराचे सेवन केले पाहिजे, तर आपल्याला थायरॉईड डिसऑर्डरची समस्या उद्भवणार नाही.संतुलित प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर आणि मीठ यांचे सेवन करावे.

निरोगी वातावरण हवे (Healthy Environment Is Essential) –
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या मते, पर्यावरणीय समस्येमुळे थायरॉईड विक वाढतात.
वातावरणातील वाढती रसायने आणि प्रदूषणामुळे ही समस्या उद्भवू शकते. बर्‍याच पर्यावरणीय घटकांमुळे थायरॉईड संप्रेरक पातळीत असंतुलन होऊ शकते.
नियमित व्यायाम आणि ताज्या हवेत चालणे फायदेशीर ठरू शकते.

 

थायरॉईड डिसऑर्डर वाढवणारे घटक (Factors That Increase Thyroid Disorder) –
जास्त ताण घेतल्याने शरीरावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतो, यामुळे थायरॉईड विकारांना देखील चालना मिळू शकते.
तणाव घेतल्याने थायरॉईड डिसऑर्डर थेट होत नाही, परंतु यामुळे स्थिती वाईट होऊ शकते. तणावाचा प्रभाव आपल्या शरीराची पाचनशक्ती कमी करतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Thyroid Disease Symptoms And Precautions | thyroid disease symptoms and precautions what not to do with thyroid problems

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Drink | ‘या’ दोन पद्धतीने सकाळी रिकाम्यापोटी प्या जीरा वॉटर, नंतर पहा जादुई ड्रिंकची कमाल

 

Nail Biting Side Effects | सवय असेल तर तात्काळ सोडा ! बसल्या-बसल्या कुरतडत असाल नखे तर जाणून घ्या कोणत्या 7 भयंकर आजारांना देत आहात निमंत्रण!

 

Calcium Deficiency | हातापायात वेदना असू शकते कॅल्शियमच्या कमतरतेचा संकेत, जाणून घ्या उपाय