नक्षलवाद्यांनी भारतीय जवान राकेश्वर सिंहची केली सुटका, हल्ल्यानंतर केलं होतं अपहरण

बीजापूर : वृत्तसंस्था –   छत्तीसगड येथील बिजापूरमध्ये ३ एप्रिल रोजी CRPF च्या जवानांची आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत २२ सैनिक शहीद झाले आणि नक्षलवाद्यांनी CRPFचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर नक्षलवाद्यांनी मेसेज पाठवून म्हटले जावं पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु आज कमांडो राकेश्वर सिंग मनहास यांची सुटका करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी एक निवेदन जारी केले आहे की, बुधवारीच नक्षलवाद्यांनी जावं राकेश्वर सिंग मनहास यांचा फोटो प्रसिद्ध केला. मनहास सुखरूप आहेत. त्या फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांच्या बनवलेल्या झोपडीत बसलेला दिसत होता.

मंगळवारी लक्षलवाद्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुकमा व विजापूर सीमावर्ती भागात शनिवारी चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या CRPF च्या कोब्रा बटालियनचा एक सैनिक त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी जवानाला सोडण्यासाठी राज्य सरकारकडे विचारणा केली असता मधला मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली. यावरूनच CRPF जवान सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले. या दरम्यान, CRPF ने राकेश्वर सिंग मनहासच्या चित्राबाबत दुजोरा दिला आहे. परंतु, राकेश्वर सिंग मनहास यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट घातली होती.

दरम्यान, नक्षलवाद्यांनी पकडलेल्या CRPF राकेश्वर सिंग मनहास याला सोडण्यात आले आहे. तसेच नक्षलवाद्यांनी हे फोटो काही पूर्वी जाहीर केला होता. नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याची सुटका करायची असल्यास एक अट समोर ठेवली आहे. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट नक्षलवाद्यांनी ठेवली होती. त्यानंतर सरकारने मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर जवानाला सोडण्यात आले आहे.