29 वर्षांपूर्वी सलमान, आमिरसह अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्ससोबत स्क्रिनवर दिसले होते टायगर श्रॉफ आणि सोनम कपूर ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –फिल्म निर्माता सुभाष घई यांनी यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोत दिसत आहे की, 29 वर्षांपूर्वी सोनम कपूर आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी बडया बॉलिवूड स्टार्सची भेट घेतली आहे.

सुभाष घई यांनी शेअर केलेल्या फोटोत सलमान खान, आमिर खान, गोविंदा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सचिन, नसीरूद्दीन शहा, ममूटी आणि रसिक दवे दिसत आहे. खास बात अशी की, या फोटोत टायगर श्रॉफ आणि सोनम कपूरही दिसत आहेत. टायगर पिता जॅकी श्रॉफच्या मांडीवर बसला आहे तर सोनम कपूर पप्पा अनिल कपूरच्या बाजूला उभी आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

https://youtu.be/hLbT87wegto

फोटो शेअर करताना सभाष घई म्हणतात, “90 च्या दशकातील सुपरस्टार्स, माझी शॉर्ट फिल्म प्यार की गंगा बहे(1991) च्या शुटींगदरम्यान. देशातील ऐक्यावर बी शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर सोबत टायगर आणि सोनम आहे.” सोनम आणि टायगर 1991 मध्ये डायरेक्टर सुभाष घई यांच्या एका गाण्यात दिसले होते. गाण्याचं नाव होतं प्यार की गंगा बहे.