‘मुलींसारखा दिसतो’, अशा कमेंट्स मिळाल्या होत्या टायगरला त्यानंतर तो रडलाही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफची बॉलिवूड एँट्री म्हणावी तशी दमदार झाली नाही. टायगरने जेव्हा फिल्ममध्ये एँट्री केली तेव्हा त्याला अनेक कमेंट्स दिल्या गेल्या. यामध्ये त्याला ‘मुलींसारखा दिसतो’ असेही म्हटले होते. या कमेंटनंतर टायगर श्रॉफ रडलाही होता, अशी माहिती त्याने स्वत:च दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या टायगर त्याच्या फिल्ममध्ये जबरदस्त ऍक्शन करण्यात प्रसिद्ध आहे. त्याच्या फिल्ममधील भूमिका गाजत आहेत. तो अनेक फिल्ममध्ये फाईट आणि ऍक्शन सीन्स करताना दिसत आहे. आज टायगर श्रॉफ त्याच्या करिअरमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. मात्र, यापूर्वी टायगर तसा नव्हता. जेव्हा टायगरने करिअरला सुरुवात केली तेव्हा तो ट्रोल झाला होता. जास्तच गोरा आणि चेहऱ्यावर दाढी-मिशा नसल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर थट्टा केली जात होती. काही लोकांनी तर टायगर श्रॉफची तुलना करिना कपूर सोबतही केली होती.

सोशल मीडियावर करिना आणि टायगर या दोघांचे फोटो क्लब करून शेअर करणे लोकांनी सुरु केले होते. टायगरने हिंदी फिल्ममधून सुरुवात केली होती. 2014 मध्ये ‘हिरोपंती’ ही फिल्म रिलिज झाली. त्यामध्ये त्याने पहिल्यांदा भूमिका केली. या फिल्मध्ये त्याच्या लुकमुळे त्याला ट्रोल केले होते. त्यानंतर तो रडलाही होता. याबाबतची माहिती स्वत: टायगरने दिली.