शाळकरी असताना श्रध्दा होती टायगर श्रॉफची ‘क्रश’, अभिनेत्याचा मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांचा बागी 3 हा आगामी सिनेमा 6 मार्च रोजी रिलीज होणार आहे. टायगर आणि श्रद्धाची केमिस्ट्री याआधीही लोकांना आवडली आहे. परंतु टायगरचं एक सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का. शालेय जीवनात टायगरला श्रद्धावर क्रश होतं. बागी 3 च्या प्रमोशनदरम्यान खुद्द टायगरनं याबाबत खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना टायगर श्रॉफ म्हणाला, “माझं श्रद्धावर क्रश होतं. परंतु त्यावेळी माझी एवढी हिंमत नव्हती की, मी जाऊन तिला हे सगळं सांगावं. याचा परिणाम असा झाला की श्रद्धालाही याबाबत कधी काही माहिती झालं नाही.” स्ट्रीट डान्सर थ्री डी या सिनेमाच्या वेळी अभिनेता वरुण धवननंही सांगितलं होतं की कॉलेजला असताना त्याचं श्रद्धावर क्रश होतं.

सध्या टायगर श्रॉफ दीर्घकाळापासून दिशा पाटनीला डेट करत आहे. वरुण धवन हा देखील नताशा दलालसोबत नात्यात आहे. चाहत्यांना लवकरच त्यांना लग्नाच्या बेडी अडकताना पहायचं आहे.

अहमद खान दिग्दर्शित बागी 3 सिनेमात टायगर आणि श्रद्धा लिड रोलमध्ये आहे. सिनेमाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. टायगर आणि श्रद्धाची केमिस्ट्री बागीनंतर पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. या सिनेमात टायगर आणि श्रद्धा व्यतिरीक्त रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, आशुतोष राणा, सतीश कौशिक, चंकी पांडे, नोरा फतेही, अनु कपूर हे कलाकार देखील आहे. 6 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.