‘इंडियन सुपर लीग’ च्या ओपनिंगमध्ये ‘टायगर-दिशा’ नं केला धमाकेदार ‘डान्स’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीने रविवारी 20 ऑक्टोबर रोजी इंडियन सुपर लीगमध्ये आपल्या परफॉर्मंसने धमाल केली. गोल्डन कलरच्या ग्लिटरी आउटफिटमध्ये दोघंही कमाल दिसत होते. टायगर शर्टलेस होता तर दिशाने गोल्डन जंपसूट घातला होता. सध्या टायगर-दिशाच्या डान्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिशा आणि टायगरने आपल्या लोकप्रिय गाण्यांवर मोहक डान्स केला. दोघंही पावसात सादरीकरण करत होते. याच सादरीकरणाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. इंडियन सुपर लीग भारतात होणारी फुटबॉल टुर्नामेंट आहे. याच्या नव्या सीजनचा ओपनिंग सेरेमनी केरळच्या कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आला होता.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर टायगरचा वॉर हा सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाने 300 कोटी पार केले आहेत. दिशाबद्दल सांगायचे झाले तर सध्या ती डायरेक्टर मोहित सुरीच्या मलंग या सिनेमात काम करत आहे.

View this post on Instagram

@tigerjackieshroff Bhai Ka Footwalk With @machindrashirsath & @swainvikram

A post shared by Yãshtiger🔵 (@yashtiger_fan_of_tiger_shroff) on

 

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like