Tiger Shroff-Disha Patani Breakup | टायगर श्रॉफ-दिशा पटानीचे ब्रेकअप, 6 वर्षांच्या डेटिंगनंतर नाते संपले!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tiger Shroff-Disha Patani Breakup | दिशा पटानी आणि टायगर श्रॉफबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, दिशा-टायगरने त्यांच्या 6 वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. म्हणजेच आता दिशा आणि टायगर हे कपल म्हणून एकत्र नाहीत. प्रश्न असा आहे की अखरे दिशा आणि टायगरने अचानक आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय का घेतला. (Tiger Shroff-Disha Patani Breakup)

 

टायगर-दिशा सोबत नाहीत
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील आवडत्या कपल्सपैकी एक आहेत. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. पण आता दिशा आणि टायगर कपल म्हणून एकत्र दिसणार नाहीत. एका वृत्तानुसार टायगर आणि दिशा यांच्या नात्यात गेल्या एक वर्षापासून बरेच चढ-उतार आले होते. पण या कपलने ही गोष्ट कधीच कळू दिली नाही. (Tiger Shroff-Disha Patani Breakup)

 

दिशा आणि टायगरने वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याचे खरे कारण समोर आलेले नाही. पण हे दोन्ही स्टार्स आता सिंगल लाईफ जगत आहेत हे नक्की. एका वृत्ताशी संवाद साधताना टायगरच्या एका मित्राने दोघांच्या ब्रेकअपची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. टायगरच्या मित्राचे म्हणणे आहे की, ब्रेकअपमुळे टायगरने त्याच्या कामावर कोणताही फरक पडू दिला नाही. तो पूर्वीप्रमाणेच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतोय. टायगर सध्या लंडनमध्ये त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा पटानी ’एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे.
त्याचवेळी टायगर श्रॉफ ’गणपत’ आणि ’बागी-4’मध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहे.
दिशा आणि टायगर आता कपलसारखे एकत्र नसले तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे.
आता बघूया ब्रेकअपच्या बातमीवर दिशा आणि टायगर काही बोलतात का?

 

Web Title :- Tiger Shroff-Disha Patani Breakup | tiger shroff disha patani breakup couple call it quits after dating for almost 6 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

 

SBI Best Investment Scheme | एसबीआयच्या टॉप 5 स्कीम ! येथे 1 लाखाचे झाले 9.5 लाख, 10 वर्षात 857% पर्यंत मिळाला रिटर्न

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?