Video : टायगर श्रॉफची मम्मी ‘आयशा’नं 95 किलोनं मारले ‘डेडलिफ्ट’, व्हिडीओ पाहून दिशा पाटनी म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आणि आई आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) आपल्या फिटनेसबद्द खूप जागरूक आहेत. दोघी त्यांचे फिटनेसचे आणि वर्कआऊटचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. टायगरची (tiger shroff) आई आयशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीममध्ये घाम गाळत असते. सध्या आयशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती 95 किलो वजन उचलून डेडलिफ्ट ही एक्सरसाईज करताना दिसत आहे.

आयशानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती जीममध्ये 95 किलोनं डेडलिफ्ट करताना दिसत आहे. व्हिडीओत टायगरसुद्धा दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनी कमेंट करण्यापासून स्वत:ला अडवू शकली नाही. तिनं लिहिलं की, Insane Strength.

आयशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिचा फिटनेस चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी तिचा फिटनेस पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 मध्ये दिसला आहे. टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे गनपत हा सिनेमाही आहे.