टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’ मध्ये दिशा पाटनीचा ‘बिंधास्त’ डान्स, चाहते म्हणाले- ‘आयटम क्वीन’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. रिअल लाईफ असो किंवा मग ऑनस्क्रीन असो जेव्हा जेव्हा दोघे एकत्र दिसतात तेव्हा चाहत्यांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. लवकरच दोघे आगामी सिनेमा बागी 3 च्या एका गाण्यात एकत्र दिसणार आहेत. दिशानं अलीकडेच गाण्याची लिंक ट्विटरवरून शेअर केली आहे. चाहत्यांनाही हे गाणं आवडलं आहे.

गाण्यात दिशा पाटनी खूपच हॉट आणि फिट दिसत आहे. सुंदर दिसणाऱ्या दिशाचं चाहत्यांनीही कौतुक केल्याचं दिसत आहे. चाहते तिच्या सौंदर्याचं आणि डान्सचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. असेच काही ट्विट सध्या चर्चेत आहेत. दिशाचं कौतुक करताना चाहत्यांनी जराही कसर केली नाही. काही ट्विट पाहिल्यानंतर हे तुमच्याही लक्षात येईल.

अहमद खान दिग्दर्शित बागी 3 सिनेमात टायगर आणि श्रद्धा लिड रोलमध्ये आहे. सिनेमाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. टायगर आणि श्रद्धाची केमिस्ट्री बागीनंतर पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. या सिनेमात टायगर आणि श्रद्धा व्यतिरीक्त रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, आशुतोष राणा, सतीश कौशिक, चंकी पांडे, नोरा फतेही, अनु कपूर हे कलाकार देखील आहे. 6 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

You might also like