टायगर श्रॉफला पोलिसांनी घातली ‘हातकडी’, जाणून घ्या नेमकं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपल्या अनोख्या अ‍ॅक्शन आणि डान्सिंग स्कीलमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा टायगर श्रॉफ नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या तो चर्चेत आहेत त्याच्या फोटोमुळे. टायगरला पोलिसांनी बेड्या घालून आपल्या गाडीत बसवून नेताना काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे टायगरनं नेमकं केलं तरी काय ? ज्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

टायगर श्रॉफला पोलिसांनी घातल्या बेड्या, वाचा नेमकं काय आहे कारण

दरम्यान, टायगर श्रॉफ हा त्याच्या आगामी ‘बागी 3’ सिनेमाच्या सुटिंगमध्ये व्यस्त आहे. याच सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. टायगरच्या एका इन्स्टाग्राम फॅनपेजवर हे फोटो शेअर करण्यात आले. या फोटोंसह सेटवरील त्याचे काही व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत. या सिनेमाच्या शूटिंगसाठी टायगर जयपूरमध्ये आहे.

https://www.instagram.com/tv/B6-deX4gBp5/?utm_source=ig_embed

टायगर श्रॉफचा बागी फ्रेंचायजीचा हा तिसरा जबरदस्त अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे. काही दिवसांपासून या सिनेमाची जबरदस्त तयारी सुरु आहे. बागीच्या पहिल्या पार्टमधे टायगर श्रद्धा कपूरसोबत दिसला होता. तर बागी 2 मध्ये दिशा पाटनीने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर आता बागी 3 मध्ये टायगर पुन्हा एकदा श्रद्धा कपूर सोबत रोमान्स करताना दिसणार असल्याचं म्हटंल जात आहे.

तसेच, बागीच्या या तिसऱ्या पार्टमधे टायगरसोबतच अभिनेता रितेश देशमुख सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यात रितेश एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. अहमद खाननं या सिनेमाच दिग्दर्शन केंल आहे. पहिल्या दोन पार्टप्रमाणे येणाऱ्या या तिसऱ्या पार्टमध्येही जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/