दिशा पाटनीचा फोटो शेअर करत टायगर श्रॉफ ‘खुल्लमखुल्ला’ म्हणाला – ‘Do You Love Me ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ गेल्या अनेक दिवसांपासून आपला आगामी सिनेमा बागी 3 मुळं चर्चेत आहे. चाहतेही त्याच्या सिनेमामुळे खुश आहेत. सिनेमा रिलीज होण्याआधीच आपल्या एका पोस्टमुळं टायगर चर्चेत आला आहे. टायगरनं दिशा पाटनीचा फोटो शेअर करत खुल्लमखुल्ला प्रेमाबद्दल विचारलं आहे. सध्या टायगरची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

टायगरनं नुकतंच त्याच्या आगामी बागी 3 सिनेमातील एका गाण्याच्या रिलीज होण्याबद्दल पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये दिशा पाटनीही दिसत आहे. फोटो शेअर करताना टायगरनं म्हटलं आहे की, “Do You Love Me? है सवाल. सुनो गाना है कमाल, मच जाएगा धमाल, जब तू नाचे मेरे नाल”

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉप आपल्या नात्यामुळं नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते एकत्र फिरताना स्पॉट होत असतात. परंतु त्यांनी कधीच आपलं नातं जगामोसर कबूल केलं नाही. टायगर आणि दिशाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. अनेकदा टायगर तिला प्रोटेक्ट करताना दिसत असतो.

अहमद खान दिग्दर्शित बागी 3 सिनेमात टायगर आणि श्रद्धा लिड रोलमध्ये आहे. सिनेमाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. टायगर आणि श्रद्धाची केमिस्ट्री बागीनंतर पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. या सिनेमात टायगर आणि श्रद्धा व्यतिरीक्त रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, आशुतोष राणा, सतीश कौशिक, चंकी पांडे, नोरा फतेही, अनु कपूर हे कलाकार देखील आहे. 6 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.