Video : टायगर श्रॉफनं शेअर केला ‘कॅसानोवा’चा बिहाइंड द सीन व्हिडीओ ! ‘अशी’ होती दिशा पाटनीची रिअ‍ॅक्शन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्टर टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याचं कॅसानोवा रिलीज झालं आहे. या गाण्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वजण टायगरचं कौतुक करताना दिसत आहेत. यानंतर आता टायगरनं या गाण्याचा बिहाइंड द सीन (BTS) चा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत टायगर श्रॉफ आपली सिंगिंग टीजर सुजैन डिमेलो (Suzanne Dmello) सोबत गाण्याची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टायगरनं लिहिलं की, इथं काही झलक दाखवत आहे की, मी माझी कमालीची टॅलेंटेड सिंगिंग टीचर सुजैन डीमेलो सोबत कशी कॅसानोवाची तयारी केली आहे.

टीचरचे आभार मानत टायगरनं लिहिलं की, थँक्यु मॅम माझ्यासारख्या अनाडी सोबत एवढं धैर्य ठेवल्याबद्दल. प्रॅक्टीसचा पूर्ण व्हिडीओ लवकरच माझ्या चॅनलवर उपलब्ध असेल.

अशी होती दिशा पाटनीची रिअ‍ॅक्शन
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीनं देखील हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे. वॉव असं म्हणत तिनं व्हिडीओवर कमेंटही केली आहे. सोबत तिनं अनेक इमोजी आणि इमोटिकॉन्सचाही वापर केला आहे. दिशा आणि टायगरच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. परंतु दोघांनी कधीच यावर खुलून भाष्य केलं नाही.