Video : टायगर श्रॉफचे नवीन गाणे ‘कॅसनोवा’ रिलीज, जबरदस्त ‘डान्स’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या अ‍ॅक्शन सीनसाठी बरेच नाव कमावले आहे. आता टायगर सिंगिंग जगतात स्वत: ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. टायगर श्रॉफचे आणखी एक नवीन गाणे यूट्यूबवर रिलीज झाले आहे. ज्याचे नाव आहे ‘कॅसानोवा’. या गाण्यात टायगर जबरदस्त डान्सिंग मूव्हसह परफेक्ट एब्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. टायगरचे हे गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट मिळत आहे. यापूर्वी टायगरने ‘अनबिलीव्हेबल’ हे गाणे प्रसिद्ध केले होते, जे चाहत्यांना खूप आवडले.

टायगर श्रॉफने आपले नवे गाणे ‘ कॅसानोवा’ ला आवाज दिला आहे. या गाण्याचे बोल अवितेश श्रीवास्तव यांनी लिहिले आहे , तर गाण्याचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा यांनी केले आहे. बॉलिवूड स्टारनेही आता गायक म्हणून स्वत: ला सिद्ध केले आहे. हे गाणे आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. टायगरचे हे गाणे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/tigerjackieshroff/?utm_source=ig_embed

टायगरने आपल्या इंस्टाग्रामवर त्याच्या ‘ कॅसानोवा’ गाण्याचे व्हिडिओ क्लिपही शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले “मी माझे पुढचे सिंगल गाणे सादर करण्यास खूप उत्सुक आहे, मला आशा आहे की आपणा सर्वांना हे गाणे आवडेल” . त्याच्या या गाण्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, टायगर श्रॉफचे पहिले गाणे नाही, याआधीही त्याने अनबिलीव्हेबल गाणे गायले आहे. जे लोकांनाही फार आवडले होते. ‘अनबिलीव्हेबल’ या गाण्यासोबत त्याने गाण्याच्या क्षेत्रातही जोरदार एन्ट्री मारली होती.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यासोबतच टायगर श्रॉफ लवकरच हिरोपंती 2 मध्ये दिसणार आहे,. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खानने केले असून 2021 मध्ये 16 जुलै ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय टायगर गणपत पार्ट 1 मध्येही दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन विकास बहल करणार आहे.