अभिनेत्री दिशा पाटनीच्या Bold अवताराचा सोशलवर बोलबाला ! फोटो पाहून टायगर श्रॉफची बहीण कृष्णा म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडिओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते, तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशूट. अलीकडेच तिनं मालदीवमधील काही लेटेस्ट फोटो सोशलवर शेअर केले आहेत, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

दिशानं तिच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. यात दिशा प्रचंड हॉट दिसत आहे. दिशाच्या काही फोटोत ती बोल्ड बिकिनीत दिसत आहे. वेगवेगळ्या फोटोत वेगळ्या बिकिनीत आणि वेगळ्या पोजमध्ये दिसत आहे. दिशाच्या मादक अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. सध्या तिचे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत.

दिशाच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) हिनंही कमेंट केली आहे. या फोटोवर कमेंट करत कृष्णा म्हणते, क्यूट.

दिशा पाटनी आणि कृष्णा यांच्यात किती बाँडिंग आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा दोघी एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे. याशिवाय ती एकता कपूरच्या केटीना या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.