Tight Jeans Pants | धक्कादायक ! ‘टाईट’ जीन्स घालते म्हणून चक्क काका आणि आजोबांनी 17 वर्षीय मुलीशी केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Tight Jeans Pants | उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय तरुणीची टाईट जीन्स घालते (Tight Jeans Pants) म्हणून तिच्या काकांनी आणि आजोबांनी हत्या (Murder) केल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार लुधियानात (Ludhiana) मुलीचे वडील नोकरी करत असल्यामुळे ही मुलगी आपल्या आईवडिलांसोबत शहरात राहत होती.
परंतु कोरोनामुळे (Corona) हे कुटुंब गाव आलं होत. गावात ‘टाईट’ जीन्स घालून फिरण्याला मुलीच्या काकाचा विरोध होता.
यावरून काका (Uncle) आणि मुलींमध्ये अनेकदा वाद झाला होता.
काकाने आणि मुलीच्या आजोबांनी (Grandfather) हाच राग मनात ठेऊन तिला बेदम मारहाण केली. मारहाणी दरम्यान त्या मुलीचे डोके भिंतीवर आपटले. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला.

असा झाला खुलासा

त्यानंतर या दोघांनी हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून, तिचा मृतदेह नदीत फेकून देण्याचा प्रयत्न करत असताना मुलीचा पाय रेलिंगमध्ये अडकला आणि मृतदेह नदीच्या पुलावर लटकू लागला.
आपल्याला कोणीतरी पाहिलं म्हणून दोघांनीही तेथून पळ काढला.
दरम्यान मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस (Police) या मुलीचा शोध घेत होते.
त्यावेळी मृतदेह नदीच्या पुलावर लटकत असल्याचे पोलिसांना आढळून आले आणि हत्येचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

वडिलांचा खून करुन केले अंत्यसंस्कार

दरम्यान, पंजाबच्या गुरुदारपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलाने विजेचा शॉक (Electric shock) देऊन आपल्या वडिलांना संपवलं.
कोणाला काही संशय येऊ नये म्हणून वडिलांवर एकट्यानेच अंत्यसंस्कार करून टाकले.
याप्रकरणी मोठा भाऊ रछपाल सिंह याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लहान भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हरपाल सिंह असं त्याच नाव असून त्याने वडील तरसेम सिंह यांना रात्री ट्रॉलीमध्ये घेऊन अंत्यसंस्कार केले आणि राखही विसर्जित केली.

Web Title : Tight Jeans Pants | 17 years old girl killed uttar pradesh deoria after she denied no jeans

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kanpur News | अबब ! रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची विक्री करणारे 256 लोक निघाले ‘करोड’पती, आयकर आणि GST तपासणीत माहिती उघड

Raj Kundra | राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीज तयार करून कमावले कोट्यवधी रुपये

Aurangabad Crime | आईसमोर मित्र वाईट बोलल्यामुळं भर रस्त्यात मित्राचा सपासप वार करुन खून