PM नरेंद्र मोदींच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शनिवारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांसोबत राष्ट्रीय तपास यंत्रणा व दिल्लीतील तपास पथकाकडून सुरक्षेबाबत काळजी घेतली आहे.

पुणे विमानतळावरून पंतप्रधान हेलिकॉफ्टरने सीरम इन्स्टिट्यूटकडे जाणार आहेत. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेबरोबरच शहर पोलिसांनीदेखील कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. आज त्याची रियसल करण्यात आली. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात तपासणी सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी विमानतळ व सीरम इन्स्टिट्यूट येथे शुक्रवारी पाहणी करत सुरक्षेबाबत रंगीत तालीम घेतली. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमारास सिरम येथे भेट देणार आहेत. त्यानंतर एक तासांच्या भेटीनंतर ते पुन्हा परत जातील. त्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच हॉटेल, लॉजची तपासणी केली जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, पंतप्रधान सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून, त्या दृष्टीने आवश्यक सर्व पोलिस बंदोबस्ताची शहर पोलिस दलाकडून तयारी करण्यात आली आहे.

You might also like