ऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ ! जाणून घ्या कधी अन् कुठं पाहू शकता सिनेमा

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  सिने निर्माता तिग्मांशु धूलिया याच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या यारा या सिनेमाचा प्रीमीयर 30 जुलै रोजी ZEE 5 वर होणार आहे. या सिनेमातील स्टोरी उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर असून चार कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत आहे.

कास्टींग
सिनेमातील कास्टींगबद्दल बोलायचं झालं तर यात विद्युत जामवाल, अमित साध, विजय वर्मा, श्रुती हासन, केनी बासुमतारी आणि संजय मिश्रा आदी कलाकार काम करताना दिसणार आहेत. सिनेमाबद्दल आणखी बोलायचं झालं तर यारा हा सिनेमा फ्रेंच फीचर फिल्म ए गँग स्टोरी चा रिमेक आहे.

फ्रेंडशिप डेला येतोय सिनेमा
विद्युत जामवाल एका स्टेटमेंटमध्ये म्हणाला होता की, “दोस्ती एकमात्र असं सिमेंट आहे जे जगाला जोडण्याचं काम करेल.” हा सिनेमा फ्रेंडशिप डेला येत आहे. सारेच सिनेमाच्या रिलीजला घेऊन खुश आहेत. विद्युत जामवाल यानं त्याच्या इंस्टावरून एक पोस्टही शेअर केली आहे जी यारा सिनेमाबद्दल आहे. विजय वर्मानं सांगितलं की, “हा सिनेमा म्हणजेच 4 कुख्या गुन्हेगारांची कहाणी आहे. येणारा काळ त्यांच्या मैत्रीचं नक्कीच परीक्षण करेल की, सिनेमाची कथा कशा प्रकारे आकार घेत आहे. फ्रेंडशिप डेची वेळही योग्य आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like