दिल्ली : वाघिणीचा मृत्यू ‘कोरोना’मुळे नव्हे तर ‘या’ कारणाने

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – दिल्ली प्राणिसंग्रहालयातील एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणिचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे का याची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये वाघिणीचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्पान असे या वाघिणीचे नाव होते. ती दिल्ली प्राणिसंग्रहालयातील सर्वा मोठी वाघीण होती. कल्पनाचे वय 13 वर्षे होते. तिचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर मृत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने दिली आहे.

ब्राँक्स प्राणिसंग्रहालयात एका वाघाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून आम्हाला प्राणिसंग्रहालयात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबाबत सक्त सूचना करण्यात आल्या होत्या. प्राण्यांना अन्नपाणी घालताना याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे दिल्ली प्राणिसंग्रहालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

कल्पना वाघीण आजारी असल्याचे मंगळवारी लक्षात आल्याचे सुत्रांनी सांगितले. तपासणीत रक्तात निर्जलिकरणासह अधिकचे क्रिएटिनाइन आढळल्याचे सुत्रांनी माहिती देताना सांगितले. तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र तिने उपचाराला प्रतिसाद देणे सोडून दिले आणि तिचा बुधवारी मृत्यू झाला. कल्पना वाघिणीचा मृत्यू हा वय झाल्याने, तसेच मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे दिल्ली प्राणिसंग्राहलयाचे संचालक डॉ. सुनीष बक्षी यांनी सांगितले.