अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस याचिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली. सरकारच्या या निर्णयानंतर 12 तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. मात्र या संदर्भात अ‍ॅपल आणि गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन टिकटॉक हटवण्यात आले आहे. हे अ‍ॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे असे सरकारने जाहीर केले आहे.

त्यामुळे आता युझर्सला टिकटॉक अ‍ॅप नव्याने डाउनलोड करता येणार नाहीत. टिकटॉक हे एक व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप असून जगभरामध्ये हे अ‍ॅप वापरणारे सर्वाधिक युझर्स भारतात आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने अनेक जण रातोरात सेलिब्रिटी झाले आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.