बॉलीवूड अभिनेत्रीलाही मागे टाकेल ‘ही’ 3 वर्षांची चिमुरडी, काही महिन्यातच झाली स्टार ( व्हिडीओ )

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या एका तीन वर्षाच्या चिमुरडीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना टिकटॉकने सध्या मोठ्या प्रमाणावर भुरळ घातली आहे. प्रसिद्धीसाठी अनेकजण टिकटॉवर आपले व्हिडीओ बनवून टाकत असतात. सध्या तीन वर्षाच्या सानिया अहमदचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील सानियाचा अभिनय आणि हावभाव इतके सुंदर आहेत की एखादी अभिनेत्री देखील तिच्यापुढे फिकी पडेल.

टिकटॉकवर अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ टाकत असतात कोणी विनोदी व्हिडीओ बनवतो तर कोणी थरारक व्हिडीओ. अनेक जण प्रसिद्धीसाठी यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ टाकत असतात. मात्र सानियाच्या व्हिडीओ वरून तिच्यात असलेल्या अभिनय गुणांचे दर्शन होते. यामुळे सानियाला फॉलो करणारा प्रचंड मोठा वर्ग टिकटॉकवर आहे.

सानिया एखाद्या गाण्यावर व्हिडीओ बनवतो परंतु त्या दरम्यान तिचे हावभाव पाहण्यासारखे असतात. गाण्याच्या हिशोबाने हावभाव करणाऱ्या सानियाच्या व्हिडिओची अनेक जण प्रतीक्षा करत असतात. दिवसेंदिवस सानियाचे प्रसिद्ध खूपच वाढत चालली आहे.

भारतात सर्वात जास्त युजर्स आहेत टिकटॉकचे
टिकटॉकचे सगळ्यात जास्त युजर्स भारतामध्ये आहेत, जगभरात या अँपचे 1.5 अरब युजर्स आहेत. 2019 मध्ये 27.76 कोटी लोकांनी हे अँप डाउनलोड केलेले आहेत. वर्षातील टिकटॉक हे बिना गेमचे अँप असूनही डाऊनलोडींच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये पहिला क्रमांक व्हाट्सअप आणि दुसरा क्रमांक फेसबुक मेसेंजरचा आहे, तर चवथ्या क्रमांकावर फेसबुक आणि पाचव्या क्रमांकावर इंस्टाग्राम आहे. .

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like