Tik Tok क्वीन सोनाली फोगाट झाली भावूक, निवडणूकीतील पराभवानंतर केलं ‘असं’ काही (व्हिडिओ)

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. यामध्ये महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेच्या साथीने आपला गड राखला असून हरियाणामध्ये देखील सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडत आहेत. याचदरम्यान, भाजपच्या एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/scribe_prashant/status/1187343307199770624

हरियाणामधील आदमपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार सोनाली फोगट हीच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ठिकाणी सोनाली फोगटला प्रभाव स्वीकारावा लागला असून काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई यांनी विजय मिळवला. टिकटॉक क्वीन म्हणून सोनाली प्रसिद्ध असून तिला भाजपने या मतदारसंघातून उतरवले होते. या व्हिडिओमध्ये ती रडताना दिसून येत असून हे व्हिडीओ तिला उमेदवारी मिळाल्याच्या आधीचे असून आता पराभवांनंतर ते पुन्हा एकदा व्हायरल केले जात आहेत. सोनालीने निवडणुकीआधी म्हटले होते कि, मला फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात पाठिंबा देणार असून मी निवडणूक जिंकणार याची मला खात्री आहे. टिकटॉकवर तिचे लाखाच्या वर फॉलोअर्स असून तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतात.

दरम्यान, सोनाली फोगट हिचे पती संजय फोगट हेदेखील भाजप नेते होते. त्यांच्या निधनानंतर तिने भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा