Tik-Tokचा धुरळाच ! आता रोज १ लाख जिंकण्याची संधी

१ लाख जिंकण्यासाठी काय कराल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्या ‘Tik-Tok’ अ‍ॅप ने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या अ‍ॅपमुळे सामान्य माणसाला सेलिब्रेटी करणाऱ्या Tik-Tok ने गुगलच्या प्ले स्टोअर वर पुन्हा एकदा एंट्री केली आहे. त्यामुळे तमाम ‘टिक टॉक’ प्रेमींमध्ये आनंद आहे. आता ‘टिक टॉक’ प्रेमींच्या आनंदात आणखी भर पडली आहे कारण Tik-Tok वरून आता तुम्हाला १ लाख रुपये जिंकायची संधी दिली आहे.

Tik-Tok ने आयओएसवर मोफत अ‍ॅपच्या यादीत पहिला क्रमांक पटकावल्याचा दावा केला आहे. तसेच प्लेस्टोअरवरही हे अ‍ॅप सोशल कॅटॅगरीमध्ये वरच्या रांगेत पोहोचले आहे. यामुळे कंपनीने नवीन कॅम्पेन सुरु केले असून #ReturnOfTikTok या नावाने ट्रेंड होत आहे. एवढेच नाही तर टीक टॉकने युजर्सना १ लाख रुपये जिंकायची संधी दिली आहे.

१ लाख जिंकण्यासाठी काय करावे लागेल
— १ लाख रुपये जिंकण्यासाठी सोशल मिडीयावर #ReturnofTikTok शेअर करावे लागणार आहे.

— या मायक्रोसाईटमध्ये युजरला एक लिंक पाठविली जाईल.

— यानुसार iOS आणि अँड्रॉईडवर अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

— १ ते १६ मे पर्यंत या स्कीममध्ये दररोज तीन जणांना विजेते घोषित केले जाणार आहे. त्यांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले जाणार आहेत.

उच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्यानंतर युजर्सनी टीक टॉकला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. यामुळे कंपनीने हे कॅम्पेन सुरु केल्याचे भारतातील अधिकारी सुमेधास राजगोपाल यांनी सांगितले. भारतामध्ये २० कोटींपेक्षा जास्त युजरनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे.

भारतात टिकटॉकचा धुमाकूळ
पबजी गेमनंतर आता भारतीय तरुणाईला Tik-Tok अ‍ॅप ने अक्षरशः वेड लावले आहे. एका अभ्यासाअंती मागील तीन महिन्यात हे अ‍ॅप प्ले स्टोअर मधून सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आले आहे. गुगल प्लेस्टोर मधून डाऊनलोड होणाऱ्या अ‍ॅपमध्ये Tik-Tok जगात तिसऱ्या क्रमांकाचे अ‍ॅप ठरले होते.

मार्च तिमाहीत टीक टॉकने १८.८ कोटी नवे युजर्स जोडले होते. त्यापैकी भारतातील ८.८६ टक्के युजर्स होते. मागील वर्षी अ‍ॅपच्या ५० कोटी युजर्सपैकी ३९ टक्क्यांपेक्षा अधिक युजर्स हे भारतातील होते.