TikTok Banned : ‘हे’ 6 बॉलिवूड सेलेब्स ‘टिकटॉक’वर सुपरअ‍ॅक्टीव ! कुणाचे किती फॉलोअर्स जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – भारत सरकारनं 59 चायनीज अ‍ॅपवर बंदी घातली आहे. यात व्हिडीओ शेअरींग अ‍ॅप टिकटॉक देखील आहे. भारतात हे अ‍ॅप खूप फेमस आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स असे आहेत जे टिकटॉकवर सक्रिय आहेत आणि त्यांचे मिलियन फॉलोवर्स आहे. हे स्टार्स कोणते आहे ते आपण जाणून घेऊयात.

1) शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टीचे टिकटॉकवर 19.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. लॉकडाऊनच्या काळात तिनं अनेक व्हिडीओ शेअर केले होते.

2) रितेश देशमुख – टिकटॉकवर जास्त सक्रिय असणाऱ्या मेल स्टारपैकी रितेश देशमुख एक आहे. त्याचे जवळपास 15.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

3) उर्वशी रौतेला – उर्वशी खूप हिट अॅक्ट्रेस आहे. तिचे इंस्टावर 8 मिलियन फॉलोवर्स आहेत. उर्वशीनं टिकटॉकच्या मदतीनं अनेक उपक्रम देखील घेतले आहेत.

4) जॅकलीन फर्नांडिस – जॅकलीन टिकटॉकवर खूप सक्रिय असते. तिनं अनेक प्रमोशनल व्हिडीओदेखील बनवले आहेत. तिचे 13.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.

5) हिना खान – हिनाचेही टिकटॉकवर 3.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

6) नेहा कक्कर – सिंगर नेहा कक्कर टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेहाचे 72 लाख फॉलवर्स आहेत. तिनं अनेकदा वेगवेगळे व्हिडीओ शेअरे केले आहेत.