मायक्रोसॉफ्टचे होऊ शकते TikTok, अमेरिकेत नाही घातली जाणार बंदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : डेटा सुरक्षेबाबत वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप टिक-टॉक यांनी अमेरिकेच्या मालकीत जाण्यावर सहमती दर्शविली आहे. गेल्या महिन्याभराच्या प्रदीर्घ चर्चेनंतर टिक-टॉकची मूळ कंपनी बाईटडन्सने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी टिक-टॉकने सांगितले होते कि, अमेरिकेत बॅन होण्यापासून टाळण्यासाठी तो आपला काही हिस्सा विकू शकतो, ज्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तयार नव्हते आणि ते आज टिक- टॉकवर बंदी घालणार होते, पण शेवटच्या क्षणी टिक-टॉक अमेरिकेला संपूर्ण भागभांडवल देण्यास तयार झाला. मायक्रोसॉफ्ट आणि टिक- टॉक यांच्यातील करार पाच अब्ज डॉलर्समध्ये असू शकतो.

माहितीनुसार , मायक्रोसॉफ्टने जर टिक-टॉक विकत घेतले तर ते अमेरिकेतील वापरकर्त्यांच्या डेटासाठी जबाबदार असेल. वापरकर्त्यांचा डेटा मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवर संग्रहित केला जाईल. म्हणजेच, बाईटडन्सने चिनी नाव पुसून टाकले आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टबरोबरच्या या कराराबद्दल अद्याप टिकटॉक किंवा मायक्रोसॉफ्टकडून कोणतेही अधिकृत विधान आले नाही.

दरम्यान, भारत नंतर टिक-टॉकसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेत टिक-टॉकचे मासिक सक्रिय वापरकर्ते 80 मिलियन म्हणजेच 8 कोटी आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या या निर्णयामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर टिक- टॉक भारतात परतण्याची आशा देखील वाढली आहे.