सावधान ! TikTok झालंय आणखीच ‘खतरनाक’, WhatsApp च्या युजर्सवर करतंय ‘हल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शॉर्ट व्हिडिओ मेकिंग व शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची क्रेझ तरुणांसह अनेकांमध्ये पहायला मिळत आहे. मात्र, टिकटॉक युजर्सच्या चिंतेत वाढ करणारी माहिती समोर आली असून लाखो टिकटॉक युजर्सचा डेटा धोक्यात आला आहे. कारण, हे अ‍ॅप युजर्सच्या पर्सनल डेटावर नजर ठेवत आहे, अशी माहिती मिळत आहे. यामुळे टिकटॉकच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं एका व्हिडीओतून ही माहिती समोर आली आहे.

अ‍ॅपलने नव्या iOS 14 चे अपडेट रिलीज केले आहे. युजर्सचा डेटा अ‍ॅक्सेस करणाऱ्या अ‍ॅपची माहिती कंपनीचे नवे फीचर देत आहे. अ‍ॅपलच्या या नव्या फीचरमुळे ही माहिती समोर आलीय. याअगोदर काही दिवसांपूर्वी टिकटॉकमुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा TikTok लाखो iPhone युजर्सवर नजर ठेवून आहेत.

तसेच सातत्याने युजर्सचा क्लिपबोर्ड अ‍ॅक्सेस करत असून त्यांची महत्त्वाची माहिती वाचत आहे. सिक्यॉरिटी रिसर्चर्स तलाल हज बेक्री आणि टॉमी मिस्क यांनी युजर्सची माहिती काढणाऱ्या अ‍ॅप्समध्ये TikTok चाही समावेश असल्याचे म्हटले आहे.

अ‍ॅपलच्या iOS 14 या प्रायव्हसी फीचरमुळे TikTok असे करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे एक असे फीचर आहे ज्यामध्ये एखादं अ‍ॅप तुमची परवानगी न घेता तुमच्या फोनमधील माहिती घेत असल्याचे समजत आहे. युजर जे काही क्लिपबोर्डवर टाईप करत आहे ते टिकटॉक आपोआप कॉपी करत आहे. यासाठी युजर्सची कोणतीही परवानगी घेतली जात नाही हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे, असे याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.