भारतात ‘बॅन’ आल्यानंतर चीनवर उचकलं TikTok, ‘ड्रॅगन’ला केलं दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टिक-टॉकने देशात 59 चीनी अ‍ॅप बॅन झाल्यानंतर बिजिंगपासून स्वत:ला दूर केले आहे. 28 जूनला सरकारला लिहिण्यात आलेल्या एका पत्रात टिक-टॉकचे चीफ एग्झीक्यूटिव्ह केवीन मायेर यांनी म्हटले आहे की, चीनी सरकारने कधीही यूजरच्या डेटाची मागणी केलेली नाही आणि कधी डेटा मागितला तरी कंपनी अशी कोणतीही माहिती देणार नाही. हे पत्र शुक्रवारी रॉयटर्सने पाहिल्याचे म्हटले आहे.

चीनी कंपनी बायट डान्सच्या मालकी हक्काचे शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अ‍ॅप टिक-टॉक हे चीनमध्ये उपलब्ध नाही. कंपनी ग्लोबल ऑडियन्सला अपील करण्यासाठी चीनी रूट्सपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीला देशात चीनसोबत सीमावादानंतर टिक-टॉकसह टेन्सेन्ट होल्डिंगचे वुईचॅट आणि अलिबाबा ग्रुपच्या युसी ब्राऊजरसह एकुण 59 अ‍ॅप बॅन करण्यात आले होते.

मेयर यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी हे कन्फर्म करतो की चीनी सरकारने आमच्याकडून भारतीय यूजर्सच्या टिकटॉक डेटाची कधीही मागणी केली नाही. त्यांनी पुढे लिहिले आहे की, इंडियन यूजर्सचा डेटा सिंगापुरमध्ये सर्व्हरमध्ये स्टोर होतो. जर आमच्याकडे भविष्यात जरी अशी मागणी झाली तरी आम्ही ती पूर्ण करणार नाही.

याप्रकरणाशी संबंधीत एका सूत्राने माहिती दिली आहे की, कंपनीने हे पत्र पुढील आठवड्यात सरकार आणि कंपनीमध्ये होणार्‍या मीटिंगपूर्वी पाठवले आहे. हा बॅन लवकर संपणार नाही. वकिलांनी म्हटले आहे की, हे कायदेशिर दृष्ट्या जिंकणे सुद्धा अवघड आहे. कारण भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा संदर्भ देत हे अ‍ॅप्स बॅन केले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like