Video : ‘कोलावेरी डी…’, ‘पहला-पहला प्यार’ गाण्यावर आजी-नातवाची ‘जुगलबंदी’, पाहून म्हणाल ‘वाह-वाह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – व्हिडीओ मेकींगसाठी प्रसिद्ध असणारे टीकटॉक अ‍ॅप बंद करण्यासाठी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. टीकांचा सामना करणाऱ्या टीकटॉकवर जे व्हिडीओ बनवले जातात ते नक्कीच व्हायरल होताना दिसत असतात. यावर बनवलेले व्हिडीओ केवळ लोकांना आवडतच नाहीत तर नात्यांच्या ट्युनिंगलाही हृदयाशी जोडताना दिसतात. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत एका आजी आणि नातवाची जोडी प्रसिद्ध गाणं कोलावरी डी वर डान्स करत मस्ती करताना दिसत आहे.

https://www.tiktok.com/@akshaypartha/video/6706464386568965381?refer=embed

व्हिडीओत दिसत आहे की आजी आपल्या नातवाला चांगलीच साथ देत आहे. दोघेही यात क्युट अंदाजात दिसत डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून लोकांना खूपच भावला आहे. यावर अनेक युजर्सने कमेंट करत त्यांच्या स्टेप्सचे कौतुक केले आहे. अनेकांनी या व्हिडीओला शेअर केले आहे.

http://vm.tiktok.com/Rfd38b/

याच आजी नातवांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. कोलावरी डी नंतर या दोघांनी पहला पहला प्यार गाण्याच्या रिमिक्स वर्जनवर देखील एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. आजी नातवाच्या दोन्हीही व्हिडीओंचा सोशलवर धुमाकूळ सुरू आहे.

आजी आणि नातवाची ही जुगलबंदी अनेकांना भावली आहे असे दिसत आहे. वयाच्या या वर्षीही एवढा ताजेपणा आणि नातवासाोबत एवढं मस्ती करणं हे नक्कीच प्रेरणादायी आणि कौतुक करण्यासारखं आहे. आजींचा हा व्हिडीओ सर्वच वयातील लोकांना आवडला आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

Loading...
You might also like