TikTok खरेदीच्या तयारीत ‘हे’ भारतीय CEO, हैदराबाद पब्लिक स्कूलचे होते विद्यार्थी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनचे अ‍ॅप टिक टॉकवर भारतानंतर आता अमेरिकेत सुद्धा प्रतिबंध लावला जाऊ शकतो. यादरम्यान माहिती मिळाली आहे की, ते खरेदी करण्यासाठी एका दिग्गज टेक कंपनीचे मुळ भारतीय वंशाचे सीईओ इच्छूक आहेत. टेक्नॉलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्ट टिक टॉकच्या अमेरिकन ऑपरेशन्सला खरेदी करू शकते. मायक्रोसाफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी याबाबत चर्चा सुरू केली आहे, जी शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. सत्या नडेला यांनी हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.

नडेला यांच्याशिवाय हे दिग्गजसुद्धा एचपीएसचे विद्यार्थी
सत्या नडेला यांच्याशिवाय अडॉबचे सीईओ शांतनु नारायण, मास्टरकार्डचे सीईओ अजयपाल सिंह बंगा आणि अरबपती इन्व्हेस्टर प्रेम वत्स सुद्धा हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये शिकले आहेत. हैद्राबाद पब्लिक स्कूलने या चारही दिग्गज सीईओशिवाय राजकारण, अभिनय, पोलीस व प्रशासकीय सेवेसाठी सुद्धा एकापेक्षा एक चांगले विद्यार्थी दिले आहेत. एचपीएस हैद्राबादच्या बेगमपेटमध्ये आहे. सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ अधिवक्ता मेनका गुरुस्वामी सुद्धा एचपीएसमधून पासआउट आहेत.

जगनमोहन रेड्डी सुद्धा एचपीएसचे विद्यार्थी
मेनका गुरुस्वामी न्यूयॉर्कच्या कोलंबिया लॉ स्कूलमध्ये बीआर आंबेडकर रिसर्च स्कॉलर आणि लेक्चरर आहेत. याशिवाय येल लॉ स्कूलमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरन्टो फॅकल्टी ऑफ लॉमध्ये सुद्धा व्हिजिटींग फॅकल्टी आहेत. तर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी देखील एचपीएसमध्ये शिक्षण घेतले आहे. आंध्र प्रदेशचे माजी सीएम एन. किरण कुमार रेड्डी सुद्धा याच शाळेत शिकले.

एचपीएसने एंटनटेन्मेन्ट वर्ल्डला दिले अनेक दिग्गज
एचपीएसमधून शिकणारे एन्टरटेन्मेन्टमध्ये अनेक दिग्गज आहेत. यामध्ये नागार्जुन आणि राणा दुग्गाबती यांच्यासारखी नावे आहेत. एचपीएसचे प्राचार्य डॉ. स्कंद बाली यांनी म्हटले की, यांच्याशिवााय इंडियन क्रिकेट कॉमेंटेटर आणि पत्रकार हर्षा भोगले सुद्धा याच शाळेत शिकले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like