TikTok वर बंदी नको, तक्रार करा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘टिकटॉक’ वर कोणालाही आक्षेप असतील तर, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार प्रक्रिया करून संबंधित यंत्रणेकडे तक्रार करता येईल. मात्र पूर्णपणे अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी अयोग्य असल्याची भूमिका ‘टिकटॉक’ इंडिया तर्फे मांडण्यात आली.

‘टिकटॉक’ अ‍ॅप मुळे लहान मुले ते तरुणापर्यंत सर्वांना याचे वेड लागले असून विचारसरणीवर व मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. तसेच अश्लील व्हिडिओ देखील भरपूर भरणा आहे. त्यामुळे या व्हिडीओ अ‍ॅप वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी मुंबईतील गृहिणी हिना दरवेश यांनी अ‍ॅड. अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल आहे.

यासाठी प्रभारी न्यायमूर्ती भूषण धर्मधिकारी व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यामूळे या अ‍ॅपवर माहिती-तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत नियमन आहे. अ‍ॅपवर काही आक्षेपार्ह आढळ्यास कायद्यातील कलम ६९-अ अन्वये संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल करता येते. म्हणून कोणतेही ठोस कारण नसताना अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी चुकीची असून हि याचिका फेटाळण्यात यावी,असे म्हणणे ‘टिकटॉक’ तर्फे जेष्ठ वकील मिलिंद साठे यांनी मांडली. त्यानंतर या युक्तिवादाला उत्तर द्यावे, असे निर्देश खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना दिले,पुढील सुनावणी तीन आठवडयांनी ठेवली