‘ही’ टिकटॉक स्टार करिश्मा कपूरची ‘कार्बन कॉपी’, लोक म्हणाले – ‘कुदरत का करिश्मा’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टिकटॉक या अॅपवरून आजवर अनेक सिलिब्रिटींच्या कार्बन कॉपी समोर येताना दिसल्या आहेत. हुबेहूब स्टार प्रमाणे दिसणाऱ्या अनेकांनी आजवर अटेंशन घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर सारखी दिसणारी एक टिकटॉक स्टार सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत आहे.

करिश्मासारख्या दिसणाऱ्या तरूणीचं नाव आहे हिना. हिनाचे टिकटॉकवर तब्बल 2.4 मिलियन्स फॉलोवर्स आहे. ती दिसायला हुबेहूब करिश्माच आहे. इतकंच नाही तर ती नेहमीच करिश्मच्या डायलॉग्सवर व्हिडीओ तयार करत असते.

हिना आणि करिश्माच्या चेहऱ्यातही खूप साम्य आहे. तुम्ही तिला पाहिल्यानंतर तुम्हीही ही गोष्ट मान्य कराल. सध्या हिना खूप अटेंशन गेत आहे. अनेकांनी तिला कुदरत का करिश्मा म्हटलं आहे. सध्या तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहेत.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिनं डिजिटल डेब्यू केला आहे. अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या सीरिजमध्ये करिश्मानं काम केलं आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक होताना दिसलं. या सीरिजमधून तिनं दीर्घकाळानंतर कमबॅक केलं आहे.

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like