‘या’ सुंदर TikTok स्टारनं बनवला घुबडासोबतचा ‘असा’ व्हिडीओ, बसला 25 हजाराचा ‘दणका’ (व्हिडीओ)

सुरत :  वृत्तसंस्था – रोज कितीतरी नवीन टिकटॉक व्हिडियो सोशल मीडियावरती अपलोड होत असतात. कित्येक लोक आज टिकटॉक मुळे संपूर्ण जगासमोर येत आहेत आणि स्टार बनत आहेत, पण तेच टिकटॉक कितीतरीजणांना अडचणीचे ठरत आहे. अशीच एक घटना गुजरातमधील टिकटॉक स्टार कीर्ती पटेल सोबत घडली आहे.

कीर्ती ने घुबडाला घेऊन टिकटॉक व्हिडियो केल्यामुळे गुजरात वनविभागाने कीर्तीला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वनविभागाने वनसंरक्षक कायदा १९७२ नुसार हा दंड केला असून वन विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

‘वन्यजीव आणि निसर्ग कल्याण मंडळाने’ वन विभागाच्या मुख्य वन सरंक्षक अधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केली होती की, कीर्ती ने ज्या पद्धतीने व्हिडियो करताना घुबडाला हातात पकडले होते ते कृत्य १९७२ च्या कायद्याचे उल्लंघन आहे. या तक्रारीची दखल घेऊन कीर्तीला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती गुजरात वन विभागाने माध्यमांना दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like