Coronavirus : ‘मास्क’ची खिल्ली उडविणार्‍या TikTok स्टारला ‘कोरोना’ची लागण !

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाची बाधा होउ नये यासाठी नागरिकांकडून सुरक्षितता बाळगली जात आहे. विशेषतः अनेकांकडून मास्क वापरले जात आहे. मात्र, टिकटॉकवरुन मास्कची खिल्ली उडविणार्‍या मध्यप्रदेशचा ‘टिक-टॉक’ स्टार समीर खानला कोरोनाची लागण झाली आहे. समीरने त्याच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये मास्कची खिल्ली उडवली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता करोनाची लागण झाल्यानंतर समीरने त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली आहे.

समीर मध्यप्रदेशच्या जिल्ह्यातील राहणारा असून त्याठिकाणी कोरोनाची लागण झालेला तो पहिला रुग्ण आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. टिकटॉक व्हिडीओमध्ये समीरने अरे, तुम्ही एका छोट्याशा व्हायरसमुळे मास्क का घालत आहात? या छोट्याशा कापडाच्या तुकड्यावर का विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायचा असेल तर देवावर ठेवा. त्यानंतर काही दिवसांनी समीरला खोकला, ताप, सर्दीचा त्रास झाला होता. शुक्रवारी त्याची भोपाळच्या एम्स रुग्णालयात चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात मास्क घालून समीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. समीरला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तो परिसरसुद्धा सॅनिटाइज करण्यात आला आहे.