सिया कक्करनंतर आणखी एका TikTok स्टारची आत्महत्या, ‘हे’ आहे मृत्यूचे कारण

पोलिसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वीच टिकटॉक स्टार सिया कक्करने आत्महत्या केली होती. आता टिकटॉक स्टार संध्या चौहान हिने देखील आत्महत्या केली असून तिने डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

संध्या दिल्लीच्या ग्रीन पार्क कॉलनी येथे राहत होती आणि दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी होती. संध्याने वयाच्या १८ वर्षीच आत्महत्या केली. या प्रकरणी तपास सुरु असून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. तसेच संध्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न पडला आहे.

संध्या गेल्या २-३ महिन्यांपासून तणावात होती. त्यामुळे सध्या तरी तिने डिप्रेशन मुळे आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, सर्वात पहिले तिच्या कझिनने तिचा मृतदेह पाहिला. आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच सरकारने ५९ चिनी ऍप्स बंद केले आहेत. टिकटॉक बंद झाल्याने संध्या अस्वस्थ होती. टिकटॉक स्टार सिया कक्करने २६ जून रोजी आत्महत्या केली होती.