‘सिंगर’ नेहा कक्करने TikTok Video मध्ये केला ‘सेक्सी डान्स’, मागून मुलीने दाखवली चप्पल !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सिंगिंग जगतातील प्रसिद्ध नाव आहे. नेहाचं गाणं असो किंवा तिचा फोटो असो किंवा व्हिडीओ चाहत्यांचे तिला नेहमीच प्रेम मिळत असते. नेहाचं पंजाबी गाणं वाह वही वाह हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यावर टिकटॉकवर अनेकांनी व्हिडीओज बनवले. यानंतर नेहादेखील स्वत:ला आवरू शकली नाही. तिनेही आपल्या या गाण्यावर टिकटॉक व्हिडीओ बनवला आहे.

https://www.instagram.com/p/B3V2BI3DFMa/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडीओत दिसत आहे की, नेहा कक्कर सेक्सी डान्स करत आहे. नेहाची प्रत्येक स्टेप चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. नेहाने घातलेला स्लिटवाला आणि फ्लॉरल प्रिंटवाला मल्टिकलर ड्रेसही तिला खूप सूट करत आहे. यात तिच्यासोबत भाऊ टोनी कक्कर आणि काही इतर मुलंही दिसत आहेत. नंतर या डान्समध्ये नेहाची गर्ल्स टीम एन्ट्री करताना दिसते. एक मुलगी डान्स करताना नेहाच्या मागून तिची चप्पल दाखवताना दिसत आहे.

सध्या नेहाचा हा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट केली आहे. आपल्या टिकटॉक व्हिडीओमुळे नेहा पु्न्हा चर्चेत आली आहे.

Visit : Policenama.com