तरूणीनं ओठाला ‘ग्लू’ लावून चिटकवले ओठ, 70 लाख लोकांनी पाहिलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – Tiktok वर अनेक अनोखे व्हिडिओ शेअर केले जातात, जे चँलेंज म्हणून असतात. आता नवे चँलेंज ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे लोक सुपर ग्लू ने आपले ओठ चिटकवत आहे. या चँलेंजसाठी तरुणी आयलॅश ग्लू किंवा नेल ग्लू चा वापर करतात. या चँलेंजची सुरुवात चोलेहॅमक 4 नावाच्या एका यूजरने केली अशी चर्चा आहे. या यूजरने आपल्या ओठांवर ग्लू लावला आणि चिटकवून एक व्हिडिओ तयार केला, त्यानंतर तो शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिचे ओठ मोठे आणि फुललेले दिसून येत आहे.

या व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात येत आहे, याशिवाय हा व्हिडिओ आता ट्विटवर देखील ट्रेडिंगमध्ये आहे. जेथे अनेक जर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. काहींनी तर हे चँलेंज स्विकारुन स्वता:वर देखील ट्राय केले आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला.

एका यूजरने हे ट्राय करुन व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन दिले की, OMG, मी देखील हे ट्राय केले आणि त्याने माझे ओठ मोठे झाले. हा व्हिडिओ अनेक दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला, त्यानंतर हा व्हिडिओ 70 लाख पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला. त्यावर 9,000 हजार पेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like