रुग्णांचा उपचार करण्याऐवजी डॉक्टर ‘Tik Tok’ व्हिडिओ शूट मध्ये मग्‍न, झाली निलंबनाची कारवाई

पोलिसनामा ऑनलाईन – Tik Tok व्हिडिओ तयार करणे सध्या अनेकांना अडचणीत आणत आहे. या Tik Tok ची लोकांना एवढे व्यसन लागले आहे की, ते कुठे काय करत आहेत हे त्यांच्या लक्षात राहत नाही. असाच एक प्रकार हैद्राबादमध्ये एका सरकारी रुग्णालयात घडला, येथे फिजियोथेरपी डिपार्टमेंटचे मेडिकल स्टूडेंट्स टिक – टॉक व्हिडिओ शूट करताना दिसेल आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण –

व्हिडिओमध्ये दिसणारे विद्यार्थी खासगी कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करुन गांधी हॉस्पिटलमध्ये इंटर्न शिप करत आहेत. या दरम्यान दोघांकडून टिक – टॉक व्हिडिओ शूट करण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर गांधी हॉस्पिटल प्रशासनाने दोन्ही मेडिकल विद्यार्थ्यांना सस्पेंड केले आहे.

असाच प्रकार काल गुजरातमध्ये देखील घडला होता. गुजरातमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांने पोलीस ठाण्यात टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबनाला सामोरे जावे लागले.

या महिला पोलीस असलेल्या अर्पिता चौधरी यांनी पोलीस ठाण्यात आपला टिक-टॉक व्हिडिओ शूट केला. मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलीस ठाण्यात त्या कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यातच त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात असलेल्या तुरुंगाच्या समोर ती बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना व्हिडिओत सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त –