‘लॉकडाऊन’ दरम्यान WhatsApp, TikTok ला मागे टाकून ‘हे’ App भावलं लोकांना, सर्वाधिक झाले ‘डाऊनलोड’

पोलीसनामा ऑनलाईन :   लॉकडाउन दरम्यान लोक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. एकमेकांशी संपर्कात रहाण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. यात सर्वांत, झूम अ‍ॅप सर्वाना मागे टाकत इतके लोकप्रिय ठरले आहे कि, भारतातील सर्वात जास्त वेळा डाउनलोड केलेले अ‍ॅप बनले आहे. होय, या प्रकरणात झूम अ‍ॅपने तरुणांमध्ये लोकप्रिय व्हॉट्सअ‍ॅप आणि टिकटॉक आणि इंस्टाग्रामला मागे टाकले आहे.

झूम अ‍ॅप म्हणजे काय?

सिलिकॉन व्हॅली आधारित स्टार्टअपने बनविलेले हे अ‍ॅप व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप आहे, ज्यात एकावेळी 50 लोक जोडले जाऊ शकतात. माहितीसाठी झूम हे एकमेव अ‍ॅप आहे ज्यात व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान 10 पेक्षा जास्त लोकांना एकाच वेळी जोडले जाऊ शकते. हेच कारण आहे की, घरून काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये हे अ‍ॅप रात्रीतून खूप लोकप्रिय झाले. आतापर्यंत 500 दशलक्ष लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे आणि तरीही ही संख्या वाढत आहे.

लॉकडाऊन दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप पाचव्या क्रमांकावर आहे. झूम एक तंत्रज्ञान कंपनीद्वारे तयार केली गेले आहे ज्याचा बहुधा कोरोना विषाणूच्या साथीवर सर्वाधिक फायदा झाला आहे. वास्तविक, झूम अ‍ॅपद्वारे घरून काम करणाऱ्या लोकांना बराच फायदा झाला. ज्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान ते सर्वात सहज होते.

अलीकडे झूम अ‍ॅपवर मोठा आरोप करण्यात आला होता. एका अहवालात म्हटले आहे की, झूम अ‍ॅपची आयओएस आवृत्ती फेसबुकवर वापरकर्त्यांचा डेटा शेअर करत आहे. मात्र, ही बातमी समजल्यानंतर कंपनीचे संस्थापक एरिक युआन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये असे लिहिले आहे की या फीचरचा आढावा घेतला जात आहे, ज्यामुळे झूम वापरकर्त्यांचा डेटा फेसबुककडून प्राप्त झाला आहे.

You might also like