अमृता फडणवीसांनी दिल्या मकर संक्रांतीच्या ‘गोड’ शुभेच्छा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सोशल मिडियावर ऍक्टिव्ह असतात. सोशलवर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशलवर त्या नेहमीच आपल्या भावना व्यक्त करीत असतात. मकर संक्रात काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यांनी आपल्या फॉलोअर्सना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.” तिळगुळ घ्या गोड बोला … मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा – और लोहरी दी लाख लाख वधाइयाँ ! ” असा संदेश त्यांनी ट्विटरवर ट्विट करून दिला आहे.

पांजाबी समुदायामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या लोहरी सणाच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत त्यांनी आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर अमृता फडणवीस अनेकदा तिखट शब्दात शिवसेनेवर टीका करताना दिसून आल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी ठाकरे कुटुंबावर देखील ट्विटरवरून टीका केली होती. त्यांचे हे ट्विटर वॉर चर्चेचा विषय बनले होते.

वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही पण अशा नेत्यासोबत राहणे ही चूक आहे असे म्हणत त्यांनी ;जागो महाराष्ट्र ‘ असे कॅम्पेन देखील सुरु केले होते. कालांतराने हे ट्विटर वॉर थंड झाले मात्र आता अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विट वरून तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळं आता सर्व विसरून गोड बोला असे तरी सुचवलं नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like